मुंबई :  राज्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.  दरम्यान मंत्री अस्लम शेख यांनी कोव्हिड 19 च्या वाढत्या केसेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सला याबाबत चौकशी करण्यास सांगितले आहे की, देशात फक्त महाराष्ट्रातच का कोरोना संसर्ग वाढतोय. 


निवडणूका असलेल्या राज्यांमध्ये का कोरोना वाढत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे की, आम्ही कोव्हिड 19  टास्कफोर्सला याबाबत अभ्यास करायला सांगितला आहे की, महाराष्ट्रातच का कोरोना संसर्ग वाढत आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तेथे का नाही? निवडणुका असलेल्या राज्यात हजारोंच्या प्रचार सभा होत आहेत. तरीसुद्धा तेथे कोरोना संसर्ग कसा वाढत नाही.



राज्यात रविवारी 63 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली.  त्यामुळे दररोज 50 हजाराहून अधिक वाढत जाणाऱ्या कोव्हिड 19 रुग्णांमुळे राज्यात लॉकडाऊन लावण्याची स्थिती आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावणे गरजेचेचं असल्याचं टास्क फोर्सने सांगितलं आहे.