मुंबई : तब्बल १७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शिवसेनेचा नेता सुनील शितपवर पक्षानं आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचा कुठलाही मोठा नेता शितपविषयी बोलायला तयार नाही. आता सुनील शितपवर कारवाई का झालेली नाही? असा प्रश्न विचारण्यात येतोय. दरम्यान, शितप शिवसैनिक नसल्याचा दावा विभागप्रमुखांनी केलाय. 


उल्लेखनीय म्हणजे, शितपच्या पत्नीनं महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकाटावर निवडणूक लढवली होती. शितप सक्रीय शिवसैनिक असताना आणि सेना नेत्यांसोबत शेकडो फोटो असताना तो शिवसेनेपासून वेगळा कसा? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.