मुंबईतील बंद पडलेली मोनो रेल सेवा लवकरच ट्रॅकवर!
गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील मोनो रेल पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मोनो रेल मे किंवा जूनमध्ये पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात मोनो रेलने सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. आता राज्य सरकराच्या परवानगीची प्रतिक्षा असल्याचे सांगण्यात येत आहे. मोनो रेलचे अधिकचे सुटे भाग आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर मोनो रेल धावण्याचा मार्ग मोकळा होईल असं सांगितल जात आहे. त्याचबरोबर मोनो रेल पुन्हा सुरू झाल्यानंतर तिकीटांचे सुधारीत दर लागू केले जातील असे 'एमएमआरडीए'च्या वतीने सांगण्यात आले आहे.
मोनो बंद पडण्यामागील हे कारण?
९ नोव्हेंबर २०१७ रोजी मोनोरेलमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. मैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या मागच्या डब्याला आग लागली.महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोनोरेल स्थानकावर पहाटे उभी असल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना ५ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. या आगीमुळे मोनोरेलची सेवा ठप्प झाली. ती आजतागायत बंदच आहे.
मैसूर कॉलनी स्टेशनवर मोनोरेल उभी असताना या ट्रेनच्या मागच्या डब्याला अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ३० मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मोनो रेलची चाचणी सुरु