पुन्हा भाजप-शिवसेनेचं सरकार येणार ? काय आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी ?
राज्यात सत्ता बदल होणार, पुन्हा भाजपचं सरकार येणार?
Maharashtra Politcal Crisis : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा क्लायमॅक्स अखेर जवळ आलाय. राज्यात सत्तांतराचे वारे वाहू लागलेत. यात शिंदे गटाची भूमिका अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. नव्या सरकारसाठी शिंदे गटानं स्ट्रॅटेजी तयार केल्याचंही बोललं जातंय.
काय आहे शिंदे गटाची स्टॅटेजी ?
1) सत्तासंघर्षात खरी शिवसेना कोणती हा वाद असल्याचं शिंदे गट आम्हीच खरी शिवसेना आहोत अशी भूमिका घेऊ शकते. बंडखोर आमदार शिवसेनेतून बाहेर पडलेले नाहीत शिवाय सगळ्या आमदारांचं बहुमत आपल्या बाजूने असल्यानं शिंदे गटाची हीच भूमिका राहिल.
2) शिंदे गटाच्या भूमिकेमुळे भाजप-शिवसेना सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होईल. त्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पुढील काही वर्ष सुरू राहिल.
3) शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या संमतीनुसार बंडखोर आमदारांना हे नाव वापरता येईल. आयोगाच्या परवानगीशिवाय हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.
4) आणखी एका प्लॅननुसार बहुमत चाचणीवेळी शिंदे गट गैरहजर राहू शकतो. त्यामुळे संख्याबळाअभावी ठाकरे सरकार कोसळेल. त्यानंतर भाजप सत्तास्थापन करेल. नव्या सभपतींच्या निवडीनंतर शिंदे गटाला ख-या शिवसेनेचा दर्जा दिला जाईल आणि त्यांच्यावरील निलंबनाचं संकट दूर होईल.
गेल्या 10 दिवसांपासून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे मविआच्या सत्तेला सुरूंग लागलाय. आता अखेरच्या टप्प्यात राज्याच्या राजकारणात काय उलथापालथ होते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.