मुंबई : 'नाही म्हणणाऱ्या मुलींना पळवून आणून तुमच्या समोर उभं करीन' असं म्हणणाऱ्या आमदार राम कदमांच्या विधानांची त्यांच्या पक्षानं आता दखल घेतलीय. या प्रकरणी राम कदमांना व्हिडिओ क्लीप सादर करण्याचे आदेश पक्ष नेतृत्वानं दिले आहेत. दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदमांनी त्यांच्या समोर असलेल्या गोविंदांना उद्देशून एक भाषण केलं. काल संध्याकाळपासून या वक्तव्यावरून बराच गदारोळ उठलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


धिक वाचा : व्हिडिओ : दहीहंडीच्या गर्दीसमोर राम कदम यांचा जीभेवरचा ताबा सुटला


 


कदमांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्यानं जोर धरतेय. त्यामुळे आता पक्षानं कदमांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. 


 


अधिक वाचा : या तरूणीकडून भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेन्ज


 

दरम्यान, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं म्हणत राम कदम यांनी जनतेची माफी मागितलीय.