मुख्यमंत्र्यांचा मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचा Action Plan तयार!
CM Eknath Shinde : गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाऊन राहतोय असं चित्र आहे. मुंबईकर सध्या ठाणे, दिवा, मुंब्रा, डोबिंवली, बदलापूर, कल्याण या भागात पूर्वी स्थिरावलेला दिसतोय
CM Eknath Shinde : मूळ मुंबईकर (Mumbaikar) किंवा मराठी (Marathi) माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय अशी ओरड कायमच केली जातेय आणि बऱ्याच प्रमाणात हे खरंय आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही असे म्हटल्यानंतर सुरु झालेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा आजही सुरुच आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळाली पण त्यासाठी 106 जणांना हौतात्म पत्करावं लागलंय. तर बेळगाव कारवार हे भाग अद्यापही कर्नाटक सरकारची गळचेपी सहन करतायत. दुसरीकडे गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाऊन वसतोय असं चित्र आहे. यासाठी वाढती महागाई, जागांचे भाव, बेरोजगारी यासारख्या विविध समस्या कारणीभूत असल्याचे म्हटलं जातयं.
मुंबईकर बाहेर पडून परप्रातिंय स्थिरावत आहेत
मुंबईकर सध्या ठाणे, दिवा, मुंब्रा, डोबिंवली, बदलापूर, कल्याण या भागात पूर्वी स्थिरावलेला दिसतोय. मात्र नोकरीसाठी रोज त्याला मुंबईच गाठावी लागतेय. उलट महाराष्ट्राबाहेरुन मुंबईत येणारे कामगारांचे लोंढे थांबायचे नाव घेत नाहीये. कामासाठी आलेले परप्रांतिय मुंबईतल्याच काही लोकांच्या जीवावर अनधिकृत बांधकामे करुन राहताना दिसताय. मात्र मुंबईतला मराठी माणूस मात्र मुंबईच्या वेशीवर फेकला गेल्याचे पाहायला मिळतय.
मराठी माणूस मुंबईत परतणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पण आता मराठी माणसाला मुंबईत परत आणणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. लोकसत्ता वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. "राज्यात जसं सरकार बदललं आहे तसाच मुंबईचा विकासात्मक कायपालट करण्याचा सरकारने निर्धार केलाय. फक्त निवडणुकीसाठी मराठी माणसाचे राजकारण न करता पुनर्विकासामुळे मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी. यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सवलती देण्यास सरकार कटिबद्ध आहे," असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
काय आहे योजना?
"च्या माध्यमातून बांधकाम व्यवसायातील अनेक अडचणी दूर झाल्या. मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यावर भर देण्यात आलाय. बांधकाम व्यावसायिकांनी मुंबईत मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे बांधावीत. त्यामुळे मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत येईल. त्यासाठी आवश्यक सवलती देण्यास सरकार तयार आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.