मुंबई : कोरोनाचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आता ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपी’ अधिक भर देण्यात येणार आहे. तसे स्पष्ट संकेत राज्यसराकरडून देण्यात आले आहेत. राज्यातल्या कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करायला, तसेच तपासणीसाठी पुल टेस्टींगची पद्धत वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्री आणि सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  दरम्यान, राज्यातल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरु करण्याची मागणीही केंद्र सरकारकडे केली आहे, त्यालाही आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.


दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची शुक्रवारी नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. काल ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती  राजेश टोपे यांनी दिली.