मुंबई : महाराष्ट्र राज्यात मोठा पक्ष भाजप असताना त्यांनी सरकार स्थापन करणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेत ५०-५० टक्के सत्तेत वाटा मिळण्यावरुन एकमत न झाल्याने तसेच भाजपने हा प्रस्ताव नसल्याचे म्हटल्याने युतीची चर्चा थांबली. शिवसेनासोबत येणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरकार स्थापन करण्याचा तिढा वाढला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेकडे सत्ता स्थापनेची विचारणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडे शिवेसनेने प्रस्ताव दिला आहे. तर काँग्रेसकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होत आहे. याबैठकीला खास करुन राजकीय सल्लागार अहमद पटेल उपस्थित आहेत. त्यामुळे पटेल यांची यात भूमिका महत्वाची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शिवसेना - भाजप युतीचा काडीमोडी होण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपाप्रणित एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला आता आज रात्री ८ वाजण्याच्या आधी पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे संख्याबळ सादर करावयाचे आहे. त्यानंतर सत्ता स्थापनेचा शिवसेना दावा करु शकते. त्यामुळे काँग्रेसची भूमिका महत्वाची आहे.


दिल्लीत सध्या काँग्रेसची तातडीचे बैठक सोनिया गांधी यांच्या उपस्थित बैठक सुरु असल्याची माहिती आहे.  सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी रजनीताई पाटील, ए. के. अँटोनी, अहमद पटेल बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे निर्णय काय येतो याकडे लक्ष आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धठ ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.