मुंबई : शिवसेना ज्यादिवशी सत्ता सोडेल त्यादिवशी मी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देईन, अशी उपरोधीक टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नारायण राणे ज्यावेळेस सांगतील त्यावेळी काँग्रेस आमदार पदाचा राजीनामा देईन. मी नारायण राणेंचं काम राज्यात करीन. नारायण राणे माझे नेते आहेत, असं वक्तव्यही नितेश राणेंनी केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नारायण राणे यांनी नवा पक्ष काढला आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष, असं या पक्षाचं नाव आहे. बहुजन, शेतकरी, कामगार आणि तळागाळातल्या समाजाची भूमिका आम्ही मांडू आणि त्यांच्यासाठी कार्य करू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे, तसेच देऊ तो शब्द पूर्ण करू असं आपलं ब्रीद वाक्य असणार आहे, असं देखील नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.


बहुजन, शेतकरी, कामगार आणि तळागाळातल्या समाजाची भूमिका आम्ही मांडू आणि त्यांच्यासाठी कार्य करू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे, तसेच देऊ तो शब्द पूर्ण करू असं आपलं ब्रीद वाक्य असणार आहे, असं देखील यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं.


नारायण राणे हे काँग्रेस सोडून भाजपात जाणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसपक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिल्यानंतर नारायण राणे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र चर्चा निष्फळ ठरली असावी, हे आज नारायण राणे यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केल्यानंतर स्पष्ट होत आहे.