मुंबई : कोरोना संसर्गामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यात जवळपास सर्वज गोष्टी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही वर्गात बोलावण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्स अभ्यास करीत होते. त्यांनी केलेल्या शिफारशीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. लहान मुलांसाठी अटी शर्थी पाळून शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात अनलॉ़कींग नंतर विद्यालये, कॉलेज तसेच इतर शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत. परंतु पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा अद्याप सुरू झालेल्या नाही.


विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी त्यांचे लसीकरण होईपर्यंत अटी शर्थी पाळून शाळा सुरू करता येऊ शकतात तसेच 12 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे याबाबत टास्क फोर्सने सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत.


येत्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना केसेसमध्ये अशीच स्थिती राहिली किंवा केसेस कमी झाल्यास निर्बंध आणखी शिथिल केले जातील. 


जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, या देशात डेल्टा व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पहायला मिळतोय. त्यापार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील केसेसकडे आपण बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. असेही आरोग्य मंत्री यावेळी म्हणाले. 


लग्नाच्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी, राजकीय सभांमध्ये गर्दी वाढतेय. हे खरं आहे. लोकांमध्ये बिनधास्तपणा वाढतोय. जगातील तीन देशांमध्ये तिसरी लाट घातक ठरतेय. त्यामुळे आपण सर्वांनी याबाबत सावधगीरी बाळगळी पाहिजे.असेही टोपे यांनी म्हटले आहे.