मुंबई : महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या विकृताला पोलिसांच्या निर्भया पथकाने अटक केली. रामवीर चौधरी असे या विकृताचे नाव आहे. मेट्रो आणि लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक महिलांवर त्याने केमिकल टाकल्याचा संशय आहे. दोन महिलांनी या संदर्भात अंधेरी रेल्वे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांच्या निर्भया पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी रामवीर चौधरीला अटक केली.


मुंबई शहरात धावत्या रेल्वेत महिलांवर हल्ले होण्याच्या आधी घटना घडलेल्या आहेत. तसेच महिला रेल्वे डब्यात एकटी महिला पाहून त्यांना लुटण्याचा प्रयत्नही झालेला आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने महिला डब्यात पोलीस नियुक्त करण्यास सुरुवात केली. मात्र, आजही अनेकवेळा महिला डब्यात पोलीस दिसत नाही. घटना घडली की तात्काळ अंमलबजावणी होते. कालांतराने यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. महिला सुरक्षिततेच्या प्रश्न अशा घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांना त्रास देणाऱ्यांना अधिक बळ मिळत आहे. सुरक्षा व्यवस्थेबाबत दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.


अटक केलेला तरुण । व्हिडिओ