मुंबई : विमान प्रवास करण्याचं स्वप्न कुणाचं नसतं. पण ते प्रत्येकालाच अनुभवता येतं असं नाही. एक तरुणाचं हे स्वप्न पूर्ण झालं खरं मात्र घडलं भलतंच काही. एका तरुणासोबत असंच घडलं. मुंबईत विमानाच्या कार्गोमध्ये सामना चढवण्यासाठी आलेला तरुण थेट मुंबईतून अबू धाबीला पोहोचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत विमानाच्या कार्गोमध्ये सामना चढवण्यासाठी एक व्यक्ती शिरला. सामना चढवता-चढवता त्याला अचानक त्याचा डोळा लागला. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो अबू धाबीला पोहोचला होता. हा सगळा प्रकार त्याच्या लक्षात येईपर्यंत 5 मिनिटं गेली. 


मुंबईतून इंडिगो एयरलाइनचं मुंबई-अबू धाबी विमान निघणार होतं. त्यासाठी प्रवाशांचं सामना कार्गोमध्ये चढवण्याचे काम सुरू होते. कार्गो कंपार्टमेंटमध्ये कामगाराला झोप लागली. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो अबू धाबीला पोहोचला होता.  DGCA ने यासंदर्भात माहिती दिली आहे. तो कामगार सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. 


DGCA ने दिलेल्य़ा माहितीनुसार कामगार व्यक्ती कार्गोमध्ये सामना लोड करून त्यामागे झोपला. रविवारी रात्री हा सगळा प्रकार घडला आहे. जेव्हा अबू धाबीला सामना उतरवण्यासाठी मेडिकल परीक्षण करण्यात आलं. त्यावेळी हा प्रकार समोर आला. 


या कामागाराची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. DGCA च्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने या कामगाराला पुन्हा अबू धाबी-मुंबई विमानाने मुंबईच्या दिशेनं पाठवण्यात आलं. या प्रकरणानंतर त्या वेळी जे कर्मचारी उपस्थित होते त्या सर्वांना चौकशी पूर्ण होईपर्यंत कामावरून तात्पुरत्या स्वरुपात काढण्यात आलं आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.