मुंबई : कोरोनामुळे सगळ्यांचं जगणं असह्य झालंय. कुणाला बेड मिळत नाहीये तर कुणाचा ऑक्सिजनअभावी जीव जातोय. अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात देऊ केलाय. रूग्णाला बेड मिळवून देणं, ऑक्सिजन उपलब्ध करणं, इंजेक्शन कुठे मिळेल याची माहिती देणं, प्लाझ्माबाबत मार्गदर्शन करणं अशा अनेक चांगल्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवर World Martaha Organisation ग्रुप ब्लड, ब्लड प्लाझ्मा आणि हॉस्पिटलशी संबंधित मदत उपलब्ध करून देतो. यूझर्संच्या मदतीसाठी worldmaratha@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करू शकता.हा खासगी ग्रुप असल्यानं युजर्संना यात जोडण्यासाठी अप्रूव्हलची गरज पडते.


फेसबुकवर असाच एक ग्रुप आहे Humankind Global ग्रुप... देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीला मदत मिळावी यासाठी हा ग्रुप ऍक्टिव आहे.


फेसबुकवरील Powai Women Networking ग्रुपला मुंबईतल्या महिलांकडून चालवलं जातं. यात मेडिकल हेल्प, कोरोना रूग्णांना ऑक्सिजन, जेवणाची व्यवस्था, प्लाझ्मा डोनर, इंजेक्शन आदी शोधण्यासाठी मदत केली जाते.


फेसबुकवर Gurgaon Helpline ग्रुप आहे. ज्याद्वारे लोकांना हॉस्पिटलमधील बेड, मेडिसिन, प्लाझ्मा, डॉक्टर आणि अन्य माहिती शोधण्यास मदत होते.


व्हॉट्सअपवर Network Capital ग्रुपद्वारे 24x7 सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.. यात रूग्णांना मोफत सल्ला तसच सोयी सुविधांबाबत मार्गदर्शन केलं जातं.


Volunteer Group
हा व्हॉट्सअप ग्रुप कल्याणमधील तरुण डॉक्टर दीपक पोगाडे यांनी तयार केलाय. या ग्रुपमध्ये अनेक निवृत्त सेवाभावी लोक आणि शहरातील नामवंत डॉक्टर आहेत. कल्याण -डोंबिवलीतील होम आयसोलेशनमधील कोरोनाग्रस्तांना मदत करणं हा या ग्रुपचा उद्देश आहे.


कोरोना संकटात या संस्थांनी सोशल मीडियाचा ख-या अर्थानं सदुपयोग करून दाखवलाय. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावपातळीवर अनेक छोटे-मोठे ग्रुप रूग्णसेवेसाठी कार्यरत झालेत. माणुसकीचा हा नवा प्लॅटफॉर्म कोरोनाच्या महामारीत आशेचा किरण ठरलाय.