रविवारी पहाटे 5 वाजता एकनाथ शिंदे यांच्या गटातील राजेश शाह यांच्या मुलाने एका दाम्पत्याला उडवलं. यामध्ये महिलेचा अपघाती मृत्यू झाला. मिहिर शाह याला पोलिसांनी आता अटक केली आहे. पण मिहिर 60 तास फरार होता. या 60 तासात तो नेमका कुठे होता हा प्रश्न अनेकांना पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिहिर शाह आणि ड्रायव्हर राजेंद्र बिदावत या घटनेनंतर कलानगर वांद्रे येथे पोहोचले. येथे गाडी बंद पडल्यानंतर मिहिरने आपल्या गर्लफ्रेंडला तब्बल 30 ते 40 फोन केले. यानंतर तो आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गोरेगावला दोन तास होता. तेथेच तो झोपला. मिहिरची गर्लफ्रेंड ही त्याची बहिण पूजाची बिझनेस पार्टनर असल्याचे देखील कळते. 


त्यानंतर मिहिरची बहिण गर्लफ्रेंडच्या घरी गेले आणि ती मिहीरला घेऊन बोरिवलीच्या घरी गेली. घराला कुलूप लावून आई आणि बहिणीसह मिहीर पळून गेला. यानंतर सर्वजण तेथून शाहपूरकडे रवाना झाले. एक दिवस शहापूरमध्ये राहिल्यानंतर मिहीर विरारला गेला. त्याची आई आणि बहीण घरी परतले. विरारमध्ये, आरोपी त्याच्या मित्राच्या घरी राहिला. मिहिरची गर्लफ्रेंड कोण आहे? पोलीस तिची देखील चौकशी करणार का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. 


मित्राचा मोबाईल ट्रॅक 


येथे पोलिस मिहिर शाह, त्याचे कुटुंबीय, मैत्रीण आणि जवळच्या मित्रांचे फोन सतत ट्रॅक करत होते. मात्र, सर्वांचे फोन बंद होते. दरम्यान, सोमवारी रात्री मिहीर त्याच्या मित्रासोबत विरारला आला. त्याच्या मित्राचे घर विरारला आहे. मंगळवारी सकाळी त्याच्या मित्राने 15 मिनिटांसाठी त्याचा फोन ऑन केला. दरम्यान, पोलिसांना त्याचे लोकेशन सापडले आणि मिहीर शाहला अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्याची आई आणि बहिणींनाही रिसॉर्टमधून ताब्यात घेतले.


पोलिसांनी सांगितले की, राजेश शहा यांचे कुटुंबीय कारसह दोन वाहनांतून रिसॉर्टमध्ये गेले होते. सर्वांनी आपले मोबाईल फोन बंद केले होते आणि त्यांच्या घरालाही कुलूप होते. मिहीरला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी 11 टीम तयार केल्या होत्या. गुन्हे शाखेचाही सहभाग होता. त्याच्याविरोधात लूक आऊट सर्कुलर (LOC)ही जारी करण्यात आले होते.


राजेश शाह देखील कटात सामील 


राजेश शाह कार उचलण्याचा विचार करत होते, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शहा पळून गेल्यानंतर त्याचे वडील राजेश शाह हे वांद्रे येथील कला नगर येथे गेले होते, जेथे मिहीरने चालक राजऋषी राजेंद्रसिंग बिदावत याला गाडी घेऊन सोडले होते. राजेश शाह बीएमडब्ल्यू खरेदी करण्याचा विचार करत होते. दरम्यान, मृत महिलेच्या पती कावेरी नाखवाच्या माहितीवरून गस्ती पथक घटनास्थळी पोहोचले.


पोलिसांनी तात्काळ कार ताब्यात घेऊन राजेश शहासह चालक बिदावत याला अटक करून पोलिस ठाण्यात आणले. दोघांनाही 8 जुलै रोजी शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. राजेशने कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर कोर्टाने त्याला 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्याचवेळी न्यायालयाने चालक बिदावतच्या पोलीस कोठडीत 11 जुलैपर्यंत वाढ केली आहे.


येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर बुधवारी शिवसेनेनेही राजेश शहा यांची पालघरमधील पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. मात्र, शहा हे अजूनही शिवसेनेचेच सदस्य आहेत.