मुंबई : सोशल मीडियावर १८०० रुपयांच्या पैशांवरून एका घरकाम करणाऱ्या काकूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरूवातीला हा व्हिडिओ मजेशीर वाटला तरीही महिलांच साक्षरतेचा प्रश्न यातून समोर आला आहे. घरकाम करणाऱ्या स्त्रिया या सामाजिक घटकातील महत्वाचा भाग आहे. पण या स्त्रियांच्या अशिक्षितपणामुळे त्यांचे नुकसान होत असल्याचं पुढे आलं आहे. महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत', ऍड. यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. 


घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान...

Posted by Adv. Yashomati Thakur on Sunday, August 30, 2020

काकूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. काहींनी गम्मतीशीर हा व्हिडिओ पाहिला. तर काहींनी हसत हसत 'आता मोदींना १८०० रुपयाची नोट काढावी लागेल', अशी प्रतिक्रिया दिली. पण त्यानंतर या काकूंना न्याय मिळावा अशी पण मोहिम सोशल मीडियावर शेअर झाली. #JusticeforKaku म्हणत एक ट्रेंड सुरू झाला. 


घरकाम करणाऱ्या या महिला अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहेत. घरकाम करणाऱ्या या स्त्रियांमुळे कामावर जाणाऱ्या प्रत्येक महिलेला मोठी मदत मिळते. शिक्षणासाठी अथवा कामासाठी घरापासून दूर असलेल्या या तरूणांना याच महिलांचा आधार असतो. अशावेळी त्यांचा व्हिडिओ व्हायरल करत त्याची थट्टा करणं योग्य नाही.