मुंबई : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. चर्चेत राहण्यासाठी लोकं काय काय करतील? याचा नेमचं लावता येत नाही. एका दुचाकीस्वार तरूणाने भर रस्त्यात महिलेसोबत जे काही केलंय... ते बघून तुम्ही सगळेच थक्क व्हाल. तरूणाचं असं वागण्या मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. (Young Boy Express his love towards women while Bike ride ) पण या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तरुणाने चालत्या दुचाकीवरून एका महिलेच्या गालाला धरून आपले प्रेम व्यक्त केले आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला साडी घालून एका दुचाकीवर बसलेली दिसत आहे. या महिलेचे आपल्या मागून नेमके कोण येत आहे याकडे लक्ष नाही. मात्र, अचानकपणे एक तरुण बाईक घेऊन या महिलेजवळ येताना दिसतोय. दुचाकी चालवत असताना हा तरुण जवळ आल्याचे पाहून व्हिडीओतील महिला चकित झाली आहे. ती या मुलाकडे आश्चर्याने पाहते आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by BaaM diaries (@baamdiaries)


समोरच्या तरुणाने आपले गाल पकडल्यामुले व्हिडीओतील महिला चकित झाली आहे. तरुणाच्या या हरकतीनंतर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे महिलेला समजलंच नाही. हा संपूर्ण प्रकार तिसऱ्याच बाईक स्वाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या तरूणाचं देखील सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नेटकरी बाईकवरील तरुणाच्या धाडसाचं कौतूक करत आहेत. तर तरुणाच्या या कृत्यावर काही लोकांनी नापसंदीसुद्धा व्यक्त केली आहे. असे असले तरी हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडतो आहे.


हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडीओला ‘baamdiaries’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक त्याला लाईक करत आहेत. 30 मे रोजी हा व्हिडिओ अपलोड केला आहे.