विश्वासू मित्रांमुळे तुमची स्मरणशक्ती वाढत राहते
आयुष्यात चांगले मित्र मिळणं फार कठीण असतं, मात्र ज्यांना आयुष्यात चांगले मित्र मिळाले, त्यांच्या आयुष्यात नेहमीच चांगले बदल होत असतात.
मुंबई : आयुष्यात चांगले मित्र मिळणं फार कठीण असतं, मात्र ज्यांना आयुष्यात चांगले मित्र मिळाले, त्यांच्या आयुष्यात नेहमीच चांगले बदल होत असतात. चांगल्या मित्रांसोबत राहताना यशाची शिखरं गाठणं सोपं होतं.
मात्र ऐनवेळी मित्रांनी दगा दिला, तर सतत ती सल मनात कायम राहते. याचा नकारात्मक परिणामही आपल्या आयुष्यावर होत असावा, जेवढा सकारात्मक मैत्रीचा चांगला परिणाम रोजच्या जगण्या-वागण्यात होतो.
मैत्रीविषयी अतिशय महत्वाचा अभ्यास 'पलोस वन' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात विश्वासू मैत्रीमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होत असल्याचं समोर आलं आहे.
यात वय वर्षे ८० असलेल्या व्यक्तीची स्मरणशक्ती, जेव्हा ५० ते ६० वयोगटातील लोकांच्या स्मरणशक्तीप्रमाणे असेल, अशा व्यक्तींनी मैत्रीचे समाधानकारक आणि चांगले नातेसंबंध अनुभवले आहेत, असं अभ्यासातून समोर आलं आहे.
स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याचं आणखी एक कारण या अभ्यासात देण्यात आलं आहे, ते म्हणजे, सकारात्मक, विश्वासू मित्रांसोबत राहिल्यास एकटेपणा दूर होतो.