मुंबई :  Shiv Bhojan Thali scheme scam : बातमी 'झी २४ तास'च्या इम्पॅक्टची. राज्यातल्या गोर-गरीब, गरजूंना सवलतीच्या दरात जेवण मिळावे, म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळीची महत्वाकांक्षी योजना आणली. मात्र प्रत्यक्षात या योजनेच्या नावावर शिवभोजन थाळीचा काळाबाजार सुरु आहे. याचसंदर्भातले इन्व्हेस्टिगेटीव्ह स्टिंग ऑपरेशन 'झी २४ तास'ने दाखवले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. तर या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. (Zee 24 Taas Impact - Maharashtra government orders probe into Shiv Bhojan Thali scheme scam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवभोजन थाळी योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचारावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी अजब उत्तर दिले आहे. एखाद्या केंद्रात काही सापडले, तर फार मोठा घोटाळा झालाय, असे नाही, असं सांगत या प्रकरणाची तीव्रता कमी करण्याची खटपट ते करत नाहीयेत ना, असा सवाल उपस्थित होत आहे. 


अधिवेशनात मुद्दा उपस्थित होणार


'झी २४ तास'ने उजेडात आणलेल्या शिवभोजन थाळी घोटाळ्याचा मुद्दा सभागृहात उचलणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. कार्यकर्त्यांच्या सोईसाठी ही योजना असल्याचा आरोप करत शिवाजी महाराजांचं नाव आहे तिथं भ्रष्टाचार या सरकारला चालतो का, असा सवालही फडणवीसांनी केला आहे. तर या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. 



सगळ्या भरती रद्द करणार - अजित पवार


दरम्यान, भरतींच्या परीक्षांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल, त्या सगळ्या भरती रद्द करणार असल्याची महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. परीक्षा घोटाळ्यांचा तपास करुन सूत्रधारांपर्यंत पोहोचणार तसेच कुठल्या सरकारच्या काळात या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली, याचाही शोध घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.