मुंबई: ''शौर्यसन्मान २०१८'' हा विशेष कार्यक्रम रविवारी मुंबईत पार पडणार आहे, शहीद सैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमातांना कृतज्ञापूर्वक मानवंदना या कार्यक्रमातून दिली जाणार आहे.


महात्मा गांधी सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळ येथील ग. द. आंबेकर मार्गावरील महात्मा गांधी सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी 'झी २४ तास'' नं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 


बहुसंख्येनं उपस्थित राहा


नागरिकांनी  या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित रहावं, असं आवाहन 'झी २४ तास''नं केलं आहे.