मुंबई : झीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पुनीत गोयंका यांना गेम चेंजर ऑफ द इयर इंटरनॅशनल अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (IAA) ने लीडरशिप अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. मिडीया आणि मनोरंजन क्षेत्राच्या वाढीसाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पुनीत गोयंका यांना गेम चेंजर ऑफ द इयर इंटरनॅशनल अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (IAA) लीडरशिप अवॉर्डने सन्मान करण्यात आला. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राच्या वाढीसाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. तसेच एका वर्षात ZEE ची यशोगाथा लिहिण्याचे श्रेय देखील त्यांना देण्यात आले आहे. 


पुनीत गोयंका यांनी या अवॉर्डचे श्रेय ZEE च्या सपुर्ण टीमला दिले आहे. ते म्हणाले की, “ हा अवॉर्ड आमच्यासाठी प्रोत्साहन आहे. आम्ही योग्य पावले उचलत पुढे जात आहोत, हा अवॉर्ड त्याचा पुरावा असल्याचेही ते म्हणतात. तसेच हा विजय ZEE कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आहे,असेही पुनीत गोयंका म्हणाले. 


पुनीत गोयंका पुढे म्हणाले की, कंपनीची कामगिरी वाढवण्यात आणि दर्जेदार मनोरंजन सामग्री तयार करून, संपूर्ण समाजात सकारात्मक बदल घडवून आणत त्याच्या निर्धारित उद्दिष्टांकडे नेण्यात यशस्वी ठरलो आहोत. भविष्यवादी दृष्टी आणि मीडिया क्षेत्रातील तीक्ष्ण कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे ZEE मनोरंजन क्षेत्रात आघाडीवर आहे. ज्यामुळे कंपनी आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे.


पुनीत गोयंका यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, ZEE ने 190 देशांमध्ये उपस्थितीसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये यशस्वीरित्या विस्तार केला आहे. आणि आज 1.3 अब्ज नागरीकांपर्यंत पोहोचला आहे.