COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : चौकटीबाहेरचे चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या झी स्टुडीओज् चा नवीन चित्रपट, 'पुष्पक विमान'चा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आला. ‘आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त’ याच ओळीने सुरुवात होणाऱ्या या टीझरमध्ये आजोबा आणि नातू यांतील नात्याची झलक पाहायला मिळते आहे. या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराच्या लूकवरुन पडदा उचलला नाहीये. पण, तरीही मोहन जोशींच्या आवाजात प्रदर्शित करण्यात आलेला ‘पुष्पक विमान’ चा टीझर लक्षवेधी ठरतोय.


३ ऑगस्टला रिलीज 


या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे यांचे निर्मिती क्षेत्रात, तसेच वैभव चिंचाळकर यांचे दिग्दर्शनातील पदार्पण आहे. हा चित्रपट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.