मुंबई :  ZEEL-Invesco Case: भारताचा संत समाज आणि इतर धार्मिक आणि सामाजिक संघटना  ZEELच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. संत समाजाने इनवेस्कोकडून ZEEL वर बेकायदेशीर पद्धतीने अधिग्रहण करण्याच्या प्रयत्नांवर टीका केली आहे. यासोबत त्यांनी झी टीव्हीचे (Dr. Subhash Chandra) संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा यांच्या देश आणि धर्माच्या हितार्थ केलेल्या कामांचं कौतुक केलं आहे.


इनवेस्कोच्या मागे आहे तरी कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत समाजाने (Invesco) च्या उद्देशाविरोधात वक्तव्य जारी करताना म्हटलं आहे, मागील महिन्याभरात आम्हाला सर्व मीडिया संस्थांकडून प्रकाशित आणि प्रसारीत बातम्यांवरुन ही माहिती मिळाली आहे की, ZEE Entertainment ला काही इतर मीडिया कंपनी, काही एक शेअरहोल्डरच्या माध्यमातून अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही एखादी परदेशी किंवा देशी संस्था असू शकते. याबाबतीत इनवेस्कोने अजूनही कोणतीही पारदर्शकता दाखवलेली नाही. ना कोणतीही माहिती दिली आहे.


संत समाजाच्या आग्रहास्तव  ZEE ने सुरु केलं  'जागरण'


संत समाजाकडून सांगण्यात आलं आहे की, आम्ही सर्व मानतो आणि ओळखून आहोत की  ZEE चं भारतात जेव्हा पहिलं प्रसारण सुरु झालं, तेव्हा संत समाजाच्या आग्रहास्तव‘जागरण’नावाच्या कार्यक्रमाचं प्रसारण सुरु करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम दररोज प्रसारीत केल्यानंतरच इतर कार्यक्रम प्रसारीत होत होते.  ही ZEE चीच देण आहे, आज देशातील डझनभर चॅनेल्स धार्मिक कार्यक्रमांचं प्रसारण करतात आणि त्याचा लाभ सर्वांना होत आहे.


जनतेच्या सेवेत  ZEE सर्वात अग्रस्थानी


समाजाने आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे, संपूर्ण देशाने मागील २९ वर्षात पाहिलं आहे आणि सर्वांनी अनुभव घेतला आहे, बहुतांश सामाजिक विषयात आणि इतर विषयांमध्ये जेथे इतर जनताच्या भलाईसाठी आणि त्यांच्याशी संबंधित विषयात प्रचार आणि प्रसार करण्याची वेळ आली, त्यात ZEE नेहमीच आघाडीवर आहे.