बाथरुमसंबंधित या 4 गोष्टींमुळे येतात आर्थिक अडचणी
मुंबई : वास्तूच्या दुष्टीकोनातून तुमचं बेडरुम शिवाय तुमचं बाथरुम देखील महत्त्वपूर्ण आहे. जर तुमच्या बाथरुमला वास्तू दोष आहे तर याचा प्रभाव घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर होतो आणि आर्थिक स्थितीवर देखील होतो. शौचालयाच्या बाबतीत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
१. बाथरुममध्ये एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवावे. हे मीठ दर आठवड्याला बदलत राहावे यामुळे वास्तूदोष दूर राहतो.
२. बाथरुममधून पाण्याचा निचरा होण्याची दिशा ही नेहमी पूर्व दिशा असली पाहिजे. पश्चिम आणि दक्षिण दिशेला जर पाणी निचरा होत असेल तर यामुळे आर्थिक अडचणी येतात.
३. जर तुम्ही बाथरुममध्ये आरसा लावला असेल तर एक गोष्ट ध्यानात असू द्या की त्याचं तोंड दरवाजा समोर नसावं यामुळे घरात नकारात्मक गोष्टींचा प्रवेश होतो.
४. बाथरुममध्ये बादली किंवा टब हे नेहमी भरलेले असू द्या यामुळे घरात नेहमी आनंदाचं वातावरण राहतं.