मुंबई : जुलै महिना सुरु झालाय. संपूर्ण महिन्याभरात लक्ष्मी देवीची कृपा कायम राहण्यासाठी करा हे काही उपाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. घरात दररोज तुपाचा एक दिवा लावल्यास घरातील दोष दूर होतील. 


२. भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा फोटो एकत्रित असल्यास या फोटोची पूजा करा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहील. 


३. रोज सकाळी तुळशीला पाणी घाला. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. 


४. हनुमानाच्या मंदिरात लवंग टाकून दिवा लावा. तसेच हनुमान चालीसाचे पठण करा. 


५. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तांब्यांच्या कलशात पाणी घेऊन सूर्याला अर्पण करा. 


६. स्नान करताना पाण्यात कच्चे दूध आणि गंगाजल टाकून स्नान करावे. 


७. घराबाहेर पडण्यापूर्वी केशराचा टिळा लावा. महालक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावर राहील.