मुंबई : 2016 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेत. 2017 हे वर्ष लवकच सुरु होतंय. असं म्हणताच की दिवसाची सुरुवात चांगली झाल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. त्याप्रमाणेच वर्षाची सुरुवात चांगली झाल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाते. नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारीचा दिवस चांगला असल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाईल.त्यामुळे नव्या वर्षात या चुका करु नका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. कामाच्या ठिकाणी वारंवार आळस देणे म्हणजे निष्क्रियतेचे लक्षण मानले जाते. यामुळे लक्ष्मी दूर निघून जाते. 


2. अधिक वेळ झोपून राहणे म्हणजे वेळ गमावणे. तसेच ते दारिद्र्यतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे शरीरासाठी आवश्यक इतकी पुरेशी झोप घ्या. 


3. कोणतेही काम करताना ते निडरपणे कऱण्याची सवय लावून घ्या. घाबरत घाबरत एखादे काम केल्यास त्या कामात सफलता मिळणे कठीण असते. भितीमुळे आत्मविश्वास कमी होतो. याचा परिणाम तुमच्या कामावर दिसतो.


4. आळस हा यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. तो ताबडतोब दूर करा. आळस दूर राहिल्यास कामे पूर्ण होतील आणि लक्ष्मीही प्रसन्न राहील.


5. रागामुळे व्यक्ती अशांत होते. अशांत मन असताना केलेली कोणतीही कामे नीट होत नाहीत. क्रोधामुळे नात्यावर तसेच सामाजिक जीवनावरही चांगले परिणाम होत नाही. त्यामुळे नव्या वर्षात रागावर अधिकाधिक नियंत्रण कसे मिळवता येईल याचा विचार करा.