मुंबई : नऊ मार्चला यंदाच्या वर्षातील पहिले ग्रहण हे सूर्यग्रहण असणार आहे. मंगळवारी संध्याकाळी ८ वाजता ग्रहणाचे वेध लागतील आणि ९ मार्च म्हणजेच बुधवारी पहाटे ४ वाजून ४९ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. तर सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल. शास्त्रांनुसार ग्रहणाच्या काळात काही कामे करणे निशिद्ध मानले जाते. त्यामुळे खाली दिलेल्या गोष्टी करणे टाळा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- स्कंद पुराणानुसार ग्रहण काळात दुसऱ्याचे अन्न खाल्ल्याने १२ वर्षे जमा केलेले पुण्य एकत्र नष्ट होते. देवी भागवतच्या मते ग्रहणकाळात एखादा मनुष्य अन्नाचे जितके दाणे ग्रहण करतो तितके वर्ष त्याला अरुतुंद नावाच्या नरकात वास करावा लागतो. या व्यक्तीला कानाचे, दातांचे आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.


- शास्त्रांनुसार ग्रहणाच्या वेळी माणसांनी झोपू नये. ग्रहणकाळात झोपल्याने आजारपण येण्याची शक्यता असते. तर या काळात पुण्य कमावण्यासाठी माणसाने देवाचे स्मरण करावे.


- शास्त्रांनुसार ग्रहणकाळात मल-मूत्र विसर्जन करणे टाळावे नाहीतर घरात दारिद्र्य येते असा समज आहे. 


- ग्रहण काळात कोणाशीही दगाबाजी केल्यास अथवा चोरी केल्याने पुढील जन्मात तुम्हाला सर्प योनी मिळू शकते.


- ग्रहण काळात कोणत्याही किड्याला किंवा कीटकाला मारण्याने पुढील जन्मात तुम्हाला कीटकाचा जन्म प्राप्त होऊ शकतो.


- देवी भागवतनुसार भूकंपाच्या काळात किंवा ग्रहणाच्या काळात जमीन खोदू नये. हे अशुभ मानले जाते. 


- ग्रहण काळात कोणत्याही देवाच्या मूर्तीची पूजा करू नये किंवा मूर्तीला स्पर्श करू नये. पण, या काळात जप किंवा मंत्रोच्चारण करावे. देवाचे स्मरण करावे.