मुंबई : अनेकदा घरातून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपले नियोजित काम होत नाही. जिथे जातो तिथे निराशा मिळते. यावेळी असं वाटतं की आजचा संपूर्ण दिवसच खराब गेला. यावर ज्योतिष शास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय देण्यात आले आहेत ज्यामुळे तुमची नियोजित कामे योग्य वेळेत पार पडतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवार - वास्तुशास्त्रानुसार, सोमवारच्या दिवसात विशिष्ट कामासाठी बाहेर निघत असाल तर निघण्याआधी आरशात चेहरा पाहून जावे. असे केल्याने नियोजित कामे होतात.


मंगळवार - मंगळवारी कामासाठी घराबाहेर निघताना काहीतरी गोड खाऊन निघा. बेसनचा लाडू अथवा गूळ खाऊन निघाल्यास कामे होतील.


बुधवार - बुधवारी काही खास कामांसाठी बाहेर निघत असाल तर कोथिंबीरीची पाने खाऊन निघावीत. असे केल्याने कामात सफलता मिळेल.


गुरुवार - या दिवशी खास कामांसाठी निघत असाल मोहरीचे दाणे तोंडात टाकून निघा. यामुळे फायदा होईल.


शुक्रवार - शुक्रवारच्या दिवशी कामासाठी बाहेर निघत असाल तर दुधापासून बनवलेले पदार्थ खा. खासकरुन दही खाऊन निघाल्यास लाभ होईल.


शनिवार - शनिवारी कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघत असाल तर आलं अथवा तूप खाऊन घराबाहेर पडा. 


रविवार- रविवारी कामासाठी बाहेर निघताना खाण्याचे पान जवळ ठेवा. यामुळे तुमचे नियोजित काम होईल.