रविवारी हे व्रत केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील
ऱविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केली जाते. रविवारी सूर्यदेवाचे व्रत केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. असे करा हे व्रत
मुंबई : ऱविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केली जाते. रविवारी सूर्यदेवाचे व्रत केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. असे करा हे व्रत
धार्मिक ग्रंथात सूर्य देवाला अर्घ्य देण्याचे महत्त्व विशेष आहे. दरदिवशी धातूच्या तांब्यात पाणी त्यात लाल फूल आणि तांदूळ टाकून हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात.
या नियमांचे करा पालन
प्रतिदिन सूर्योदयाआधी शुद्ध होऊन स्नान करा.
स्नानानंतर सूर्यनारायणाला तीन वेळा अर्घ्य द्या
संध्याकाळच्या वेळेस पुन्हा सूर्यदेवाला अर्घ्य देऊन नमस्कार करा.
श्रद्धने सूर्यदेवाचा मंत्र जपा
आदित्य हृद्याचे नियमित पठण करा.
रविवारी तेल, मीठ खाऊ नये तसेच एकदाच भोजन करा.