मुंबई : विवाह ठरवताना मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूळ आणि सिंह - या दोनही राशींचा स्वभाव सारखाच असतो. लोकांशी संवाद साधणे, हसतमुख राहणे यांना आवडते. 


मेष आणि कुंभ - या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात. हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात. 


मेष आणि कर्क - मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते. 


मेष आणि मीन - मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात. मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात. 


वृषभ आणि कर्क - हे दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात. त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात. 


वृषभ आणि मकर - हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहतात. वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात. त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चांगले पटते. 


मेष आणि धनू - धनु राशीच्या व्यक्ती नेहमी स्वत:च्या मनाचं ऐकतात. या मस्ती, मजाक करणे यांना आवडते. 
  
कर्क आणि मीन - ह्या दोन्ही जल तत्वाच्या रास आहेत. या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भावूक असतात. तसेच एकमेकांना दुख होणार नाही याची ते काळजी घेतात.  
 
सिंह आणि धनू - या दोन्ही राशीचे लोक पार्टीचे शौकीन असतात. सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनू राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. 


कन्या आणि मकर - कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात. पटकन एखाद्यासमोर आपले मन मोकळे करु शकत नाहीत. या वेळेस मकर राशीचे लोक यांच्याप्रती फारच सहजरित्या आकर्ष‍ित होऊन जातात.


सिंह आणि मिथुन - सिंह आणि मिथुन राशीच्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात.   


वृश्चिक आणि वृषभ - वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बर्‍याच बाबतीत एक सारखे असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात.    
 
वृश्चिक आणि कर्क - वृश्चिक आणि कर्क दोघेही जल तत्वाच्या रास आहेत. त्यामुळे या दोनही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात. या व्यक्ती संवेदनशील असतात. तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. 


वृश्चिक आणि मीन - मीन राशीच्या व्यक्तीशी वृश्‍चिक राशीच्या लोकांचे चांगले जमते. मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.
 
कुंभ आणि मिथुन - या दोन्ही वायुतत्व असणार्‍या रास आहेत. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात. 
 
मिथुन आणि तूळ - या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांवर अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते.