मुंबई : अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नवरात्रची सुरुवात होते. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होणार आहे. यावर्षी नवरात्रच्या वर्षी विषेश योग जुळून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेथे एकीकडे श्राद्ध समाप्त होतंय तर दुसरीकडे नवरात्रची सुरुवात होत आहे. यासोबतच दोन शुभ योग हस्त नक्षत्र आणि ब्रह्म योग देखील एकत्र येत आहे. जो खूपच फलदायी असतो. यावर्षी 10 दिवस नवरात्र असल्याने भाऊबीज २ दिवसाची असणार आहे. यावर्षी दुर्गा माताचं आगमन अश्व वरुन होणार आहे तर प्रस्थान म्हैसवरुन होणार आहे.


यावर्षी १० दिवसाची नवरात्र असणार आहे. जी सुख-समृद्धी आणणार आहे. 11 ऑक्टोबरला दसरा आहे. यावर्षी विशेष गोष्ट म्हणजे यावर्षी  देवीचं आगमन अश्व तर  गमन म्हैसवरुन होणार आहे. जे अतिशुभ मानलं जातं. देवीपुराणमध्ये म्हटलं आहे की, देवीचं आगमन आणि प्रस्थानासठी वार महत्त्वाचा असतो.


आगमन :


रविवार आणि सोमवारी हत्ती, शनिवारी आणि मंगळवारी घोडा, गुरुवारी आणि शुक्रवारी पालखी, बुधवारी बोटीतून आगमन होतं.


प्रस्थान :


रविवार आणि सोमवारी म्हैस, शनिवार आणि मंगळवारी घो़डा, गुरुवारी आणि शुक्रवारी हत्तीवरुन नरवाहन वरुन प्रस्थान होतं.