वर्षातून एकादाच होतात महाकालच्या पाच मुखांचं दर्शन
शिव नवरात्रीपर्वात नऊ दिवसांत भक्तांना महाकालच्या अनेक रुपांचं दर्शन झालं नाही, त्या भक्तांना गुरुवारी तब्बल सहा तासांपर्यंत महाकालच्या पाच मुखांचं दर्शन झालं.
उज्जैन : शिव नवरात्रीपर्वात नऊ दिवसांत भक्तांना महाकालच्या अनेक रुपांचं दर्शन झालं नाही, त्या भक्तांना गुरुवारी तब्बल सहा तासांपर्यंत महाकालच्या पाच मुखांचं दर्शन झालं.
उल्लेखनीय म्हणजे, वर्षातून केवळ एकदा बाबा महाकालच्या पाच मुखांचं दर्शन एकाच वेळी करण्याची संधी भक्तांना मिळते.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजता बाबा महाकालाचे पाच मुखवटे श्रृंगारित केले गेले होते. पंच मुखारविंदमध्ये बाबा महाकाल श्री मनमहेश, श्री शिवतांडव, उमा महेश, छबीना तसंच होळकर मुखवट्यात एकाच वेळी दिसतात.
दुपारी ३ वाजता मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता संध्या आरती आणि पूजा करण्यात आली.