मुंबई : हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते. महाभारतात भीष्म पितामह यांनी म्हटले होते की पत्नीला नेहमी खुश ठेवले पाहिजे यामुळे वंश वृद्धि होते. गरुड पुराणातही पत्नीच्या गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. यानुसार ज्यांच्या पत्नीमध्ये हे ४ गुण असतील तर ती नवरेमंडळी नक्कीच भाग्यशाली समजली जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहकर्तव्यदक्ष - जी पत्नी घरातील सर्व कामांमध्ये निपुण असते तिला गृहकर्तव्यदक्ष म्हटले जाते. हे गुण ज्या पत्नीमध्ये असतात त्या पतीला प्रिय असतात.


प्रियवदिनी - बोलण्यात नेहमी संयमता ठेवणारी पत्नी पतीला आवडते. तसेच घरातील इतर सदस्यांशीही बोलताना तिची वाणी मधुर असली पाहिजे. 


पतीचे नेहमी ऐकणारी - जी पत्नी आपल्या पतीला सर्वस्व मानते ती नेहमी पतीच्या आदेशाचे पालन करते. पतिव्रता पत्नी नेहमी पतीच्या सुखासाठी प्रयत्न करत असते. पतीचे मन दुखावले जाणार नाही याची ती काळजी घेते.


धर्माचे पालन करणारी - आपले कुटुंब आणि पतीचे हित कसे जोपासले पाहिजे हा पत्नीचा पहिला धर्म मानला जातोय. जी आपल्या धर्माचे पालन करते ती पत्नी पतीला प्रिय असते.