मुंबई : आज घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होतंय. आजपासून पुढचे 10 दिवस हा गणेशोत्सव सुरु असतो. वास्तुशास्त्रातही काही वस्तूंचा संबंध भगवान गणेशाशी जोडण्यात आलाय. आजच्या दिवशी घरात या 5 वस्तू आणल्यास गणेशाची कृपा आपल्यावर राहतेच त्याचबरोबर लक्ष्मी देवीही प्रसन्न होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. धनसंबंधित समस्या दूर करण्यासाठी नृत्य करणारी गणेशाची मूर्ती घरात ठेवणे पवित्र मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाची दृष्टी राहील अशा पद्धतीने मूर्ती ठेवा. 


2. बासरी घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वास कायम राहतो. तसेच वास्तुदोषही दूर होतात.


3. ज्या घरात देव्हाऱ्यात नारळ ठेवून त्याची नियमित पूजा केली जाते तेथे नकारात्मक वातावरण राहत नाही. 


4. शंखामध्ये वास्तुदोष दूर करण्याची क्षमता असते. ज्या पूजाघरात शंखाची स्थापना केली जाते तेथे लक्ष्मी स्वत: निवास करते. 


5. भगवान कुबेर उत्तर दिशेचे स्वामी मानले जातात. त्यामुळे उत्तर दिशेला कुबेराची मूर्ती ठेवल्यास कधी पैशाची तंगी जाणवत नाही.