वास्तुशास्त्रातील हे उपाय केल्यास घरात राहील सुख-समृद्धी
वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनातील स्थान मोठे आहे. वास्तुशास्त्र एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे. सुखी-समृद्धी जीवनासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
मुंबई : वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनातील स्थान मोठे आहे. वास्तुशास्त्र एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे. सुखी-समृद्धी जीवनासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
जाणून घ्या या ५ टिप्स
1.हळद, केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते
2. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.
3. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.
4. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.
5. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.