तुमची जन्म तारीख तुमच्या करिअरविषयी काय सांगते?
मुंबई : न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार अनेक शक्यता वर्तवता येतात.
मुंबई : न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार अनेक शक्यता वर्तवता येतात. जन्मतिथी हा प्रत्येक व्यक्तीचा मुल्यांक असतो. तुमच्या मुल्यांकानुसार तुमच्या करिअरविषयी अनेक शक्यता वर्तविता येतात. तुमचा जन्म जर ९ तारखेनंतर येत असेल तर तुमच्या जन्मतारखेतील क्रमांकाची बेरीज करुन जो आकडा येतो तो मुल्यांक मानला जातो.
एक
ज्यांची जन्मतारीख एक आहे त्या व्यक्ती प्रशासक, नेता, मंत्री किंवा इतर उच्च स्थानावर अधिकारी होण्याची शक्यता असते. ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्ती व्यवसाय करण्याची इच्छा बाळगत असतील तर कपडा, शेती, स्टेशनरी, धान्य किंवा तंबाखूच्या व्यापारात यश मिळण्याची शक्यता जास्त असते.
दोन
ज्यांची जन्मतारीख दोन आहे अशा व्यक्ती शीतपेय, काचेच्या वस्तू, पाण्यासंबंधी व्यवसाय, कवी, नर्स आणि शिक्षक बनण्यासाठी योग्य असतात. व्यवसाय करायचा असल्यास ते केमिस्टचा व्यवसाय करू शकतात.
तीन
जन्मदिनांक तीन असणाऱ्या व्यक्ती सचिव, खगोलशास्त्री, खेळाडू, अभियंता किंवा डॉक्टर होण्याच्या लायक असतात. व्यवसाय करायचा झाल्यास आयात-निर्यात किंवा दलाली करण्यात या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात.
चार
जन्मदिनांक चार असणाऱ्या व्यक्ती नोकरी करण्यासाठी योग्य असतात. या गटातील व्यक्तींनी व्यवसाय केल्यास तो रोख रक्कम घेऊनच करावा.
पाच
ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्ती बँकिंग, विमा, चार्टर्ड अकाऊंटंट या करिअरच्या पर्यायांचा विचार करू शकतात. व्यवसाय करायचा झाल्यास शिक्षण, केमिकल, ज्योतीष यांसारख्या व्यवसायांत या व्यक्ती आपले नशीब आजमावू शकतात.
सहा
तुम्ही या गटात मोडत असाल तर तुम्हाला ललित कला, हॉटेलिंग, संगीत, अभिनय किंवा प्रचारक (पी.आर.) या क्षेत्रांत सफलता मिळू शकेल.
सात
या गटातील व्यक्ती अभियांत्रीकी, रिसर्च, शेती संबंधी काम, हेरगिरी किंवा पर्यटन संबंधी कामांत यशस्वी होऊ शकतात.
आठ
या गटातील व्यक्ती मशीनरी, छपाई, पोस्ट ऑफिस, लघू उद्योग, शोधकार्य, फॅक्टरी, स्टील व्यवसाय, कोळसा, जमिनी विक्री किंवा विविध रत्नांसंबंधी उद्योग यांत यशस्वी होऊ शकतात.
नऊ
या गटातील व्यक्ती अभियंते, न्यायाधीश, पोलीस अधिकारी किंवा सेना दलात चांगली कामगिरी करू शकतात. व्यवसाय करायचा झाल्यास या व्यक्ती खनिज, वीज, सिमेंट, जमीनीसंबंधी व्यवहार या व्यवसायांत यशस्वी होऊ शकतात.