शेकडो हातांनी कमवा आणि हजारो हातांनी दान करा!
दान तुम्हाला पुण्यवान बनवतं, असं तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल... अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, अभयदान आणि धनदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं.
मुंबई : दान तुम्हाला पुण्यवान बनवतं, असं तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल... अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, अभयदान आणि धनदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं.
कोणत्याही वस्तूचं दान करण्याचं तुमच्या मनाला वाटत असेल तर तुम्हाला संसारिक आसक्ती म्हणजेच मोहापासून सुटकारा मिळालाय, असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक पद्धतीचा मोह आवरण्याच्या भावनेची सुरुवात दान आणि क्षमेपासून होते.
संत तुलसीदास यांच्या म्हणण्याप्रमाणे, परहितसारखा दुसरा कोणताही धर्म नाही आणि दुसऱ्यांना कष्ट देण्यासारखं दुसरं कोणतंही पाप नाही.
दानाचं महत्त्व...
- दानामुळे आपण आपला धर्मच योग्य पद्धतीनं पार पाडत नाही तर जीवनातील सर्व समस्यांपासून आपण दूर राहू शकतो... कारण तुम्हाला कोणताही मोह नसतो.
- दान केल्यानं ग्रहांची पीडा दूर होण्यास मदत होतं, असं म्हटलं जातं.
- विचार न करता दान केल्याचे वाईट परिणामही होऊ शकतात.
- वेदामध्ये म्हटल्याप्रमाणे, शेकडो हातांनी कमवा आणि हजारो हातांनी दान करा...