मुंबई : ज्योतिष शास्त्रात अंकशास्त्रालाही अधिक महत्त्व आहे. अंक ज्योतिषमध्ये जन्मदिनांच्या अंकाचे गुण जुळणे आवश्यक मानले जाते. इथे जाणून घ्या जन्मतारखेनुसार कोणत्या मूलाकांची मुलगी तुमच्यासाठी विवाहयोग्य असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही व्यक्तीचा मूलांक त्याच्य जन्मतारखेवर असतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख १२ ऑगस्ट १९८७ असेल तर त्या व्यक्तीचा मूलाकं १+२= ३ असेल. 


१. ज्यांचा मूलांक १ आहे त्यांच्यासाठी १,३,५,७,९ मूलांक असलेल्या मुली विवाहयोग्य आहेत. मात्र २,४,६,८ हे मूलांक असलेल्या मुलींशी या मुलांचे जास्त पटणार नाही. वैवाहिक कलह निर्माण होण्याची शक्यता असते. 


२. ज्यांचा मूलांक २ असतो अशा मुलांनी १ आणि ७ मूलांक असलेल्या मुलींशी विवाह करु नये असा सल्ला अंकशास्त्र देते. याव्यतिरिक्त इतर मूलांक असलेल्या मुली यांच्यासाठी विवाहयोग्य आहेत.


३. ज्यांचा मूलांक ३ आहे त्यांनी ३,४,५ हे मूलांक असलेल्या मुलींपासून दूर राहावे.


४. ज्यांचा मूलांक ४ आहे त्यांच्यासाठी २,४ आणि ५ मूलांक असलेल्या मुलींशी चांगले जमेल. 


५. ज्यांचा मूलांक ५ आहे अशा मुलांनी १,२.५,६,८ हे मूलांक असलेल्या मुलींशी लग्न करणे त्यांच्यासाठी योग्य ठरेल. 


६. ज्यांचा मूलांक ६ आहे त्यांच्यासाठी १ आणि ६ मूलांक असलेल्या मुली योग्य आहेत. 


७. ज्या मुलांचा मूलांक ७ आहे त्यांचे १,३,६,५,८ आणि ९ हे मूलांक असलेल्या मुलींशी चांगले जमेल. 


८. ज्यांचा मूलांक ८ आहे अशा मुलांसाठी ५,६,७ हे मूलांक असलेल्या व्यक्ती योग्य जोडीदार म्हणून सिद्ध होऊ शकतात.


९. ज्या पुरुषांचा मूलांक त्यांना १,२,३,६ आणि ९ हे मूलांक असलेल्या मुलींची साथ भेटल्यास त्यांच्यासाठी उत्तम.