प्रशांत जाधव, झी मीडिया, वानखेडे स्टेडिअम, मुंबई :तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वानखेडे स्टेडिअमवर मॅच पाहायला जाणाऱ्या प्रत्येकाचा हा अनुभव असेल पण तो त्याने कधी मांडला नाही किंवा त्या विरूद्ध आवाज उठवला नसेल. स्टेडिअममधील ही लूट निमूटपणे सहन केली असेल.... कारण मॅच पाहायची तर येवढा खर्च तर होणार ना... असे म्हणून या लुटीकडे दुर्लक्ष केले असेल.



पोलिसांच्या बंदोबस्तात लूट


वानखेडे स्टेडिअमवर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अत्यंत मनोरंजक सामना झाला. पण या सामन्याच्या वेळी अनेक ग्राहकांना लुटण्याचा प्रकार सुरू होता. तोही पोलिसांच्या बंदोबस्तात... मॅचसाठी बंदोबस्त होता आणि इकडे लूट सुरू होती....



नेमका काय झाला प्रकार


दक्षिण आफ्रिकेने इंग्लडसमोर २३० धावांचे आव्हान दिल्यावर इनिंग ब्रेकमध्ये प्रेक्षक पोटपूजा करण्यासाठी बाहेरील स्टॉलवर गेले. त्यावेळी बाहेरी स्टॉलवर ५० रुपयांना ४५० मिलीलीटरची कोल्ड्रींक तीही एमआरपीपेक्षा अधिकने विक्री सुरू होती. तेथील आणखी एका स्टॉल तेच कोल्ड्रींक १०० रुपयांना विकले जात होते. त्यातील एका ग्राहकाने विक्रेत्यांना हटकले.  तेव्हा त्यांनी कोल्ड्रींक ७० रुपयांना असल्याचे सांगितले. ग्राहकांने कोल्ड्रींक घेतले आणि बाहेर पडला. त्यावेळी शेजारी तेच कोल्ड्रींक ५० रुपयांना होते. तो पुन्हा विक्रेत्याकडे आला तेव्हा त्यांना कळालं की आपली चोरी पकडली गेली आहे. तेव्हा त्यांनी एक समोसा २० रूपयांप्रमाणे त्या व्यक्तीला दिला.


इथे ते फसले. सुरूवातीला एका कोल्ड्रिंकचे १०० रुपये सांगणारे ते कोल्ड्रींक ७० रुपयात दिले. त्यानंतर चुकीने समोसा द्यायचं राहिलं सांगून एक समोसा देऊन ग्राहकांची बोळवण करत होते. त्यावेळी ग्राहकाने आरडाओरडा केला.



विक्रेत्याची अरेरावी...


ग्राहकाला कळाल्यावर त्याने आरडाओरडा केला त्याने विक्रेत्याला त्याचा सुपरवायझर कुठे आहे विचारले तेव्हा त्याने त्या ग्राहकाशी हुज्जत घातली आणि त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करत होते.  हा प्रकार पत्रकारांनी पाहिला. पत्रकारांनी त्यांना जाब विचारला पण  आपण कोणाला घाबरत नाही, जा जे काही करायचे ते करा, असे सांगितले.



जागो ग्राहक जागो... पण


सरकार टीव्हीवर मोठमोठ्या जाहिराती करतं. जागो ग्राहक जागो... पण अनेक दिवसांपासून सुरू असलेला किंबहुना प्रत्येक मॅचला होणारा हा लुटीचा  प्रकार कधी थांबणार... की तुम्ही या ठिकाणी गेलात तर तुम्हाला पूर्ण पिळून काढू असा उद्देश अशा प्रकारच्या ग्राहकपयोगी स्टॉलचा असतो याचं उत्तर राज्य सरकारने दिलं पाहिजे..... 


हा लेखातील असा काही अनुभव तुम्हालाही एखाद्या मॉलमध्ये, मैदानामध्ये, थिएटरमध्ये आला असेल तर हा लेख जरूर फॉरवर्ड करा... इतका की राज्य सरकारच्या त्या ठिम्म मंत्र्यांपर्यंत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत थोडशी कृती करण्याची बुद्धी आली पाहिजे....