शैलेश मुसळे, मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाची झळ बसणाऱ्या मराठावाडा आणि इतर जिल्ह्यांना यंदा मात्र पावसाने दिलासा दिला आहे. जनावरांना आणि शेतीला दुष्काळामुळे खूप जास्त फटका बसत होता. गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. पण यंदा मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारने जलयुक्त शिवार योजना आखली आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याची जणू शपथच घेतली. मुख्यमंत्री होण्याआधीही मुख्यमंत्र्यांनी जलसंवर्धनाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये विशेष करुन सहभाग घेतला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाडा आणि राज्यातील दुष्काळी भागांमध्ये पाऊस चांगलाच बरसत आहे. अनेक वर्षानंतर दुष्काळी भागातल्या लोकांना असा पाऊस अनुभवायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात पाऊस दुष्काळी भागात पडत असल्याने त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यापेक्षाही अधिक फायदा जलयुक्त शिवारामुळे दुष्काळग्रस्चत भागातील लोकांना होणार आहे. शासनाच्या जलशिवार योजनेमुळे दुष्काळावर मात करण्यास मदत होणार आहे.


जिवती तालुक्याला दरवर्षी पाणी टंचाईची झळ सोसावी लागत होती. कमी पावसामुळे उन्हाळ्यात येथे लोकांचं मोठे हाल होत होते पण आता मात्र येथील चित्र बदललं आहे. 
जलशिवार योजनेमुळे येथे कायापालट झाली. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक-दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजना अनेक गावांमध्ये राबवली. मोठ्या प्रमाणात शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे बांधण्यात आली आणि जास्तीत जास्त पाणीसाठा कसा होईल यासाठी प्रयत्न केला गेला. पावसाळा सुरु झाल्यानंतर याचा परिणाम दिसू लागला. जलशिवाराची कामे समाधानकारक झाली आहेत. शिवार पाण्याने भरुन वाहू लागेल्याने यासाठी मेहनत घेतलेल्य़ा गावकऱ्यांना जल्लोष केला. प्राण्यांना आणि निसर्गाला याचा सर्वात मोठा फायदा होतांना दिसत आगहे.


जलशिवार योजनेमध्ये अनेक गावांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. अनेक सामाजिक संस्थांनी देखील या कामांमध्ये खारीचा वाटा उचलला. तलाव, नद्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढला गेला आणि पात्र मोठी करण्यात आली. जास्तीत जास्त पाणीसाठा आणि अनेक वर्षांपासून तहाणलेल्या जमिनीची तहान यामुळे भागली तर मुख्य म्हणजे यामधून दुष्काळात अनेकांना रोजगार देखील मिळाला. यावर्षी जलयुक्त शिवाराची कामं मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा फायदा आज आणि या वर्षात दिसून येईलच. पण संपूर्ण महाराष्ट्र जर दुष्काळमुक्त करायचा असेल तर जलयुक्त शिवारासारख्या योजनेतून मोठ्य़ा प्रमाणात पाणीसाठा आणि जास्तीत जास्त पाणी जमिनीत कसं मुरवता येईल याकडे सगळ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी काम देखील करण्याची मोठी गरज आहे. मोठ्या प्रमाणात विशेष करुन दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजना राबवण्याची गरज आहे.