सचिन तेंडुलकरच्या जीवनपटाचा पहिला ट्रेलर रिलीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर अधारीत सचिन-या बिलियन ड्रीम्स या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर अधारीत सचिन-या बिलियन ड्रीम्स या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला.
सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये केवळ सचिन तेंडुलकरच दिसत असून इतर कलाकारांची नावं जाहीर करण्यात आली नाहीत.
जेम्स एरिक्सन दिग्दर्शित करत असलेला हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि इंग्लिश या भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. रवी भागचांदक आणि श्रीकांत भासी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
Sachin- a billion Dreams या चित्रपटात सचिन यात काही दृश्यांमध्ये दिसणार आहे.