मुंबई : जागतिक प्रतिष्ठेच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी नशीब आजमावलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल बुधावारी जाहीर झाला. 


मुंबईतील विद्यार्थ्यांची छाप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या या परीक्षेत १ लाख ९८ हजार २२६ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. प्रिय शहा हा विद्यार्थी राज्यात अव्वल ठरला असून मुंबईतीलही अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. यात प्रिय शहा हा विद्यार्थी ३३० गुण मिळवून राज्यात प्रथम तर श्रीराम बी. ३१५, अमेय पाटील ३११, शबरीश चंद्रा ३११, रजत राठी ३०५, शौर्य पांडे ३०५ आणि डिंपल कोछर २९१ या विद्यार्थ्यांनी छाप निकालावर सोडली आहे.  


अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र 


जेईई मेन परीक्षा एप्रिल ३, ९ आणि १० तारखेला देशभरातील १३१ केंद्रांवर घेण्यात आली होती. ऑफलाइन परीक्षेसाठी ९ लाख ७४ हजार २३० विद्यार्थी बसले होते. त्यातील १ लाख ७८ हजार ४०८ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. ऑनलाइन परीक्षेसाठी १ लाख ५४ हजार ४०६ विद्यार्थी बसले होते. त्यातील १९ हजार ८२० विद्यार्थी अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. 


इथं पाहा निकाल


 www.cbseresults.nic.in , www.jeemain.nic.in या वेबसाइटवर रोल नंबर आणि जन्मतारीख नोंदवून विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात.