मुंबई - आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे. 


सफरचंदात मोठ्या प्रमाणात 'लोह' असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबान इलाज आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोहा सारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात 'ब' आणि 'क' जीवनसत्वेही असतात. 


सफरचंदाचे उपयोग पुढीलप्रमाणे: 
 
1. सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.


2. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात 'फायबर' असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. 
 
3. सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते. 
 
4 .सफरचंदाच्या रसात गुलाब जलाचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते. 
 
5. केसातील कोंडा कमी करण्यासाठी रोज नियमितपणे सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.


 सफरचंद आयुर्वेदिक गुणकारी फळ आहे, कॅमिकल टाकून तयार केलेले सफरचंद बाजारात असल्यामुळे सफरचंद नीट बघून घ्यावेत आणि स्वच्छ धुवून खावेत.