मुंबई : साधारणपणे सकाळी उठून चहा अथवा कॉफी पिण्याला साऱ्यांची पसंती असते. गेल्या अनेक वर्षांपासूनची आपली ही सवय आहे. मात्र ही सवय आरोग्यदायी सवयीत बदलली तर? सकाळी उठून चहा अथवा कॉफी पिण्यापेक्षा दुधीचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे. याची चव तुम्हाला पसंत पडणार नाही मात्र याचे फायदे अनेक आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनर्जीसाठी - सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. दुधीच्या रसातील नॅच्युरल साखर केवळ ग्लायकोजीनचा स्तर नियंत्रित ठेवत नाही तर कार्बोहायड्रेटची कमतरताही भरुन काढतो.


युरिन इन्फेंक्शन -  लघवीच्या ठिकाणी जळजळ होत असल्यास दुधीचा रस पिणे उत्तम. लघवीमध्ये अॅसिडचे प्रमाण अधिक वाढल्यास जळजळीचा त्रास होतो. दुधीच्या रस प्यायल्यास हा त्रास कमी होतो. 


शरीरातील अशुद्धी बाहेर फेकण्यासाठी - रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात 98 टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. 


वजन घटवण्यासाठी फायदेशीर - दुधीच्या रसात कॅलरीज आणि फॅट्स नसतात. यामुळे तुम्ही वजन घटवत असाल तर दुधीचा रस प्यावा. यातील फायबर भूक कंट्रोल करण्यात मदत करतात. 


बद्धकोष्ठतेच्या त्रासावर गुणकारी - तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेलव तर सकाळी दुधीचा रस प्यायल्याने फायदा होतो.