मुंबई : प्रदुषणाचं प्रमाणं मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेहऱ्याची सुंदरता खराब होते. त्यामुळे आपण नेहमी चेहरा सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी मेकअप देखील करतात. पण मेकअप सोबतच चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी लिपस्टिकचा रंग बदला. तुम्ही जर लाईट लिपस्टिक वापरत असाल तर रेड रंगाची आउटलाईन करा. नवीन हेअर स्टाईल करा. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.


२. डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलकी मालीश करा.


३. चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध 15-20 मिनिटे चेह-यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होतो.


४. मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून चेह-यावर लावल्यास चेह-याचा रंग उजळतो.


५. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजरचा ज्यूस प्यायल्याने चेह-याचा रंग उजळण्यास मदत होते.