स्वतंत्र विचारांच्या मुलीला डेट करण्याआधी हे वाचाच...
एखाद्या स्वतंत्र विचारांच्या मुलीवर तुम्ही प्रेम करताय तर तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्याच लागतील. आपल्या एखाद्या कृतीमुळे तिच्या आत्मविश्वासाला, स्वाभिमानाला तडा तर जात नाही ना, याची काळजी घ्यावीच लागेल.
मुंबई : एखाद्या स्वतंत्र विचारांच्या मुलीवर तुम्ही प्रेम करताय तर तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्याच लागतील. आपल्या एखाद्या कृतीमुळे तिच्या आत्मविश्वासाला, स्वाभिमानाला तडा तर जात नाही ना, याची काळजी घ्यावीच लागेल.
पाहा, काय करता येईल... काही छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी...
नेहमी प्रेम व्यक्त करायलाच हवं असं नाही
तुम्ही ज्या मुलीवर प्रेम करता तिला कधीच गृहीत धरु नका किंवा 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' (I LOVE YOU) असं तिच्याकडून सतत ऐकायला मिळेल, अशी अपेक्षा करू नका. कदाचित ते न बोलताही ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असेल... तेही आपली कामं सांभाळून!
भावना समजून घ्या...
तिला बऱ्याचं जबाबदाऱ्या असतात... ऑफिसमध्ये, घरी बरेच व्याप तिच्यामागे असतात. तुमच्याबरोबरचं ती ही आपलं काम सांभाळते, त्यामुळे तिच्याकडून भलत्याचं अपेक्षा करु नका. समजा तिने प्रेमाचे हे तीन शब्द बोलण्यास नकार दिला, तर गैरसमज करुन घेऊ नका, कारण प्रेम हे ह्या तीन शब्दांनीच व्यक्त होत नसतं, तर तिच्या मनातील तुमच्याबद्दल असलेल्या भावना समजून घ्या.
स्वतंत्र विचारांचा आदर करा
तिच्या मनात भरपूर विचार असतात आणि हे आपणचं समजून घेऊ शकतो, बरोबर ना? म्हणजे जसे तुमच्या मनात बरेच विचार असतात, तुमच्या स्वतंत्र आयुष्याचे आणि भविष्याचे तसेच काहीसे तिचेदेखील असतील. त्यांचा आदर करा...
तिला काय आवडतं?
तुमच्या अपेक्षापेक्षा तिचा रोमान्स आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत कदाचित वेगळी असेल.
कदाचित ती इतर मुलींसारखी नसेल, तिला कदाचित सुंदर सप्रायजेस आवडत असतील किंवा इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने राहायला आवडत असेल, त्यामुळे तिच्याकडून 'टिपिकल गर्लफ्रेंड'सारखं वागण्याची अपेक्षा करू नका
कमजोर समजण्याची चूक नको
ती चुकीच्या गोष्टींचा सामना करू शकते, त्यामुळे तयार राहा... ती स्वतंत्र आहे, स्वत:च्या इच्छेप्रमाणे ती आयुष्य जगू शकते. याचा चुकीचा अर्थ काढू नका. कारण ती चुकीच्या गोष्टींचा ती सामना करु शकते, तिला कमजोर समजू नका.
सुखा-दु:खात सहभागी व्हा