108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीचे फिटनेस फंडे
18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मुंबई: 18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लहानपणी घेतलेल्या एक औषधामुळे अनंतचं वजन एवढं वाढल्याचंही बोललं जात आहे. पण वजन कमी करण्यासाठी अनंतनं कठोर परीश्रम घेतले आहेत. धोनीपासून ते सलमान खानपर्यंत अनेकांनी अनंतच्या या मेहनतीचं कौतूक केलं आहे.
ऑपरेशन नाही तर व्यायाम करून कमी केलं वजन
गैस्ट्रिक बायपास सर्जरी केल्यामुळे अनंतचं वजन कमी झाल्याचंही बोललं गेलं, पण अनंतनं नैसर्गिकरित्या रोज व्यायाम करून आपलं वजन घटवलं आहे.
रोज 21 किमीची चाल
वजन कमी करण्यासाठी अनंत अंबानी रोज 21 किमी चालायचा.
योगाची मदत
वजन कमी करण्यासाठी अनंतनं योगाचीही मदत घेतली होती.
हाय इंटेन्सिटी कार्डियो
हाय इंटेन्सिटी कार्डियोमुळे शरीरातले फॅट्स कमी व्हायला मदत होते. रोज हा व्यायाम केल्यामुळे अनंतला बराच फायदा झाला. पण सुरवातीला हा व्यायाम करायचा असेल तर प्रशिक्षकाकडून योग्य ट्रेनिंग घ्या.
खाण्यावर नियंत्रण
फिटनेस हा बहुतेक वेळा खाण्यावरही अवलंबून असतो. त्यामुळे अनंतनं वजन कमी करण्यासाठी प्रोसेस फूड, ब्रेड, पास्ता, मिठाई आणि सॉफ्ट ड्रिंक्स घेणं टाळलं. त्याऐवजी जास्त प्रोटीन असलेलं खाणं खाल्यामुळे वजन कमी व्हायला मदत झाली.