मुंबई : जेवल्यानंतर बहुतेक जण झोपायच्या तयारीला लागतात, पण याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर व्हायची शक्यता अधिक आहे. यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या जेवणानंतर लगेच करु नयेत असा सल्ला डॉक्टर देतात. 


१ लगेच झोपू नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाल्लेल्या अन्नाचं पचन व्हायला काही वेळ लागतो, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. 


२ सिगरेट पिऊ नका


सिगरेट प्यायल्यामुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. जेवल्यानंतर लगेच सिगरेट पिणं हे दहा पट अधिक धोकादायक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोकाही मोठ्याप्रमाणावर वाढतो. 


३ लगेच आंघोळ करु नका


आंघोळ करताना पाण्यामुळे शरिरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यामुळे टाळावे. 


४ जेवल्यानंतर लगेच फळं खाऊ नका


जेवणाबरोबरच तुम्ही फळं खात असाल तर या फळांचं पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेवल्याच्या एक तासानंतर फळं खायचा सल्ला डॉक्टर देतात. 


५ चहा पिऊ नका


चहापत्तीमध्ये सर्वाधिक आम्लाचं प्रमाण असतं, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळा.