मुंबई : लवंगाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातोय. याशिवाय लवंग औषधीही आहे. दातांचे दुखणे, खोकला यासारख्या समस्यांवर लवंगाचा वापर केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल हे गुण असतात. लवंग तेलाचा वापर हा त्वचाविकारांवरही केला जातो. ते एक चांगले ब्युटी प्रॉडक्ट आहे. त्याच्या नियमित वापराने अनेक त्वचाराविकारांवर फायदा होतो. 


मुरुमांच्या डागांवर लवंगाचे तेल नियमित लावल्यास डाग निघून जातात. 


लवंगाच्या तेलाच्या वापराने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. रोज रात्री झोपताना लवंगाच्या तेलाने मसाज करा. 


लवंगाच्या तेलाच्या नियमित वापराने केस लवकर पांढरे होत नाहीत तसेच गळणेही कमी होते. दरम्यान, नारळाच्या तेलात लवंगाचे तेल मिसळून लावा. कारण नुसत्या लवंग तेलाचा केसांवरील वापर नुकसानकारक ठरु शकतो.