मुंबई: गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज दुध पिल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक ऍसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं. 


शरीरातलं अशुद्ध रक्त होतं साफ


गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दुध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. 


लठ्ठपणा नियंत्रणात


गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते. 


पोटाचे विकार होतात दूर


गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात. 


सांधेदुखी वर उपाय


गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात. 


त्वचा होते मुलायम


गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.


मासिक पाळीचा त्रास होतो कमी


मासिक पाळीवेळी महिलांनी गरम दुध आणि गूळ खाल्ला तर त्रास कमी होतो. मासिक पाळी यायच्या एक आठवडा आधी 1 चमचा गूळ रोज खाल्ला तर त्रास कमी होतो. 


थकवा होतो कमी


कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दुध आणि गूळ खा. यामुळे लगेच आराम मिळतो. रोज 3 चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा दूर होतो.