शिळा भात खाण्याचे ५ फायदे तुम्हांला धक्का देईल
अनेकवेळा रात्री आपल्या घरात भात उतरतो, आपण तो शिळा झाला असे समजून गाईला किंवा इतर प्राण्यांना खायला घालतो. जास्त जास्त आपण फेकून देतो. आता तुमच्या घरी रात्री भात उरला असेल तर त्याला फेकू नका. कारण शिळा भात आरोग्यासाठी एक खजिना आहे.
मुंबई : अनेकवेळा रात्री आपल्या घरात भात उतरतो, आपण तो शिळा झाला असे समजून गाईला किंवा इतर प्राण्यांना खायला घालतो. जास्त जास्त आपण फेकून देतो. आता तुमच्या घरी रात्री भात उरला असेल तर त्याला फेकू नका. कारण शिळा भात आरोग्यासाठी एक खजिना आहे.
काय करावे
घरात भात उरला असेल तर त्याला फेकण्याऐवजी त्याला एका मातीच्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळपर्यंत हा भात फर्मेंट होतो. या भाताला तुम्ही कच्च्या कांद्यासह सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतात. हा तुमचा फेवरेट ब्रेकफास्ट नसेल पण शिळ्या भाताला अशा पद्धतीने खाण्याचे खूप फायदे आहे.
शिळा भात खाण्याचे फायदे
१. शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरिराचे तापमान कंट्रोलमध्ये राहते.
२. भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार दूर होते.
३. शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते.
४. तुम्हांला अल्सरची समस्या असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळा भात खा. तुमचा अल्सर नक्की बरा होईल.
५. तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याचे सवय (व्यसन) आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते.